Advertisement

दिवाळीसाठी स्पेशल मुलांच्या स्पेशल पणत्या

गतिमंद मुलांसाठी मंत्रालयात प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुलांनी साकारलेल्या पणत्या या प्रदर्शनात मांड्यात आल्या आहेत.

दिवाळीसाठी स्पेशल मुलांच्या स्पेशल पणत्या
SHARES

समाजात जन्माला येणाऱ्या काही नवजात बालकांची बौद्धिक क्षमता काही विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच वाढते. बौद्धिक पातळीच्या कमतरतेमुळे अशा मुलांना सामान्य लोकांमध्ये जगणं काहीसं कठीण जातं. सर्वसाधारण मुलांपेक्षा अगदी वेगळ्या मानोविश्वात रमणारी ही मुलं असतात. सामान्य मुलं देखील त्यांना आपल्यात सामील करून घेत नाहीत. मात्र हीच मुलं परिस्थितीचं आव्हान स्वीकारत जिद्दीनं स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतात. अशा या गतिमंद मुलांना जगण्याची नवी उमेद देण्यासाठी मंत्रालयात सुहित जीवन ट्रस्टनं पुढाकार घेतला आहे.


मुलांना जगण्याची नवी उमेद

गतिमंद मुलांसाठी मंत्रालयात प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुलांनी साकारलेल्या पणत्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. पणतीला रंग देण्यापासून ते डिझाईन करण्यापर्यंत सर्व कामं या मुलांनी केली आहेत. मुलांनी साकारलेल्या या पणत्या तुम्ही प्रदर्शनात जाऊन पाहू शकता आणि खरेदीही करू शकता.


पणत्यांना चांगला प्रतिसाद

मुलांनी साकारलेल्या या पणत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकं या पणत्या विकत घेत आहेत. मुलांनी या पणत्या बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक पणती साकारण्यासाठी मुलांना एक दिवस लागला. त्यामुळे आम्ही खूप आधीच पणत्यांच्या कामाला सुरुवात केली होती. त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं पण त्यांनी हे काम जिद्दीनं पूर्ण केलं, असं पणत्या विकणारे सचिन जाधव यांनी सांगितलं.





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा