Advertisement

मुंबादेवीला करणार हापूस आंब्यांचा श्रृंगार

मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीला शनिवारी हापूस आंब्यांचा साज चढवला जाणार आहे. १८ मे रोजी वैशाख पोर्णिमेला सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मंदिरात नवचंडी यज्ञ करण्यात येणार आहेत.

मुंबादेवीला करणार हापूस आंब्यांचा श्रृंगार
SHARES

मुंबईचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीला शनिवारी हापूस आंब्यांचा साज चढवला जाणार आहे. १८ मे रोजी वैशाख पोर्णिमेला सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मंदिरात नवचंडी यज्ञ करण्यात येणार आहेत. या दरम्यान आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंदिर परिसर आणि मुंबादेवीला हापूस आंब्यांची सजावट केली जाणार आहे. मुंबादेवीतील अंबे मातेचं दर्शन घेण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. 

अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी मुंबादेवीचं मंदिर बोरीबंदर परिसरात होतं. कोळी समाजाने समुद्री वादळापासून रक्षण करण्यासाठी इथं देवीची स्थापना केली होती. परंतु ब्रिटीशांनी हे मंदिर हटवून त्याजागी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बांधलं. तर मुंबादेवीच्या मंदिराला काळबादेवी परिसरात जागा दिली. मुंबादेवीच्या नावावरुनच शहराचं नाव मुंबई असं पडल्याचं मानलं जातं.  

मंदिरात नारंगी चेहरा असलेली श्री मुंबादेवीची मूर्ती आहे. या देवीच्या डाव्या बाजूला श्री जगदंबा देवी, तर तिच्या शेजारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या देखभालीसाठी १८८८ साली श्री मुंबादेवी चॅरिटीजची स्थापना करण्यात आली होती. ९ ट्रस्टी असलेली ही संस्था मंदिराचा संपूर्ण कारभार बघते.



हेही वाचा-

'तिनं' टाकाऊ जिन्सपासून बनवल्या टिकाऊ बॅग्स



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा