आला मकरसंक्रांतीचा सण

 Mumbai
आला मकरसंक्रांतीचा सण
आला मकरसंक्रांतीचा सण
आला मकरसंक्रांतीचा सण
आला मकरसंक्रांतीचा सण
आला मकरसंक्रांतीचा सण
See all
Mumbai  -  

दादर - नववर्षाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाची बाजारात लगबग सुरू झालीय. ऐन सुगीच्या हंगामात येणाऱ्या या सणाला सगळीकडे धनधान्याची रेलचेल पाहायला मिळते. पण संक्रांत म्हटलं की धन-धान्य, तिळ-गूळ जसा आठवतो, तसेच आठवतात मकरसंक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने. तेही आता बाजारात दाखल झाले आहेत. नवविवाहित जोडपं, लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. वर्षाचा पहिला सण म्हणूनही मकरसंक्रांतीला एक वेगळंच महत्त्व आहे. काळ्या साडीचा पेहराव आणि त्यावर सुरेख विणलेले हलव्याचे दागिने हे अनेक नववधूंसाठी आकर्षण असतं. या सणाला तिळगुळाइतकंच महत्त्व हलव्याच्या दागिन्यांनाही असतं. 

Loading Comments