Advertisement

गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज!

मुंबईतील गणेश विसर्जनासाठी पोलीस आणि महापालिका सज्ज झाली आहे. गिरगाव चौपटीसह मुंबईतील सर्वच चौपाट्यांवर गणेश विसर्जनाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज!
SHARES

गेले १० दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर १२ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईतील गणेश विसर्जनासाठी पोलीस आणि महापालिका सज्ज झाली आहे. गिरगाव चौपटीसह मुंबईतील सर्वच चौपाट्यांवर गणेश विसर्जनाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

५० हजार पोलीस तैनात

संपूर्ण मुंबईत ५० हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसंच विसर्जन सोहळा आणि मिरवणुकांवर ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी ५३ रस्ते बंद ठेवण्यात येणार असून  ५६ रस्त्यांवर एक मार्गिका सुरू ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहतुकींसाठी १८ रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर ९९ ठिकाणी पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. 

मुंबईतील गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, मार्वे चौपाटीसह ६९ नेसर्गिक जलस्त्रोत असलेल्या ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. त्यासोबत महापालिकेने घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकरीता शहरात ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली आहे.       

विसर्जनासाठी कृत्रिम तलाव : 

स्वान मिल मनोरंजन मैदान (शिवडी), अशोक पिसाळ मैदान (प्रतीक्षा नगर, शीव), खेड गल्ली (प्रभादेवी, दादर), महापौर निवास (शिवाजी पार्क, दादर), महात्मा गांधी विद्यालय (वांद्रे शासकीय वसाहत), संभाजी गार्डन (सांताक्रूझ पश्चिम), गजधर पार्क (सांताक्रूझ पश्चिम), डॉ. हेडगेवार मैदान (अंधेरी पूर्व), लोखंडवाला संकुल (अंधेरी पश्चिम), डॉ. बळीराम हेडगेवार मैदान (घाटकोपर पश्चिम), दत्ताजी साळवी मैदान (घाटकोपर पूर्व), पांडुरंग वाडी (गोरेगाव पूर्व), गणेश घाट (गोरेगाव पूर्व), रामलीला मैदान (मालाड पूर्व), बुवा साळवी मैदान (मालाड पूर्व), देसाई तलाव (मालाड पूर्व), आकृती महापालिका चौकी (कांदिवली पूर्व), ठाकूर व्हिलेज (कांदिवली पूर्व), लोखंडवाला तलाव (कांदिवली पूर्व), दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन (दहिसर), अशोकवन महापालिका उद्यान (दहिसर पश्चिम), तावडेवाडी (दहिसर पश्चिम), अनंतराव भोसले क्रीडांगण (बोरिवली पश्चिम), स्वप्ननगरी तलाव (बोरीवली पश्चिम), कुलूपवाडी खेळाचे मैदाने (बोरीवली) 

भरती-ओहोटीच्या वेळा-

  • ओहोटी पहाटे ४.३८ वा. -०१.०८ मीटर 
  • भरती सकाळी ११.२० वा.- ०४.०० मीटर 
  • ओहोटी संध्या. ५.२५ वा.- ०१.४७ मीटर 
  • भरती रात्री ११.२५ वा.- ०३.७० मीटर

 विसर्जन स्थळांवरील सुविधा 

स्टील प्लेट : ८९६, नियंत्रण कक्ष : ७८, जीवरक्षक : ६३६, मोटरबोट ६५, प्रथमोपचार केंद्र : ६९, रुग्णवाहिकांची संख्या : ६५, स्वागतकक्ष : ८१, तात्पुरती शौचालये : ८४, निर्माल्य कलश : २१८, निर्माल्य वाहने : २६७, फ्लड लाईट : २७१७, सर्च लाइट : ८३, निरीक्षण मनोरे : ४२, जर्मन तराफे : ४५, कामगार : ६५०१, अधिकारी : १३२३ 

१,५७० वाहतूक रक्षक

दरवर्षीप्रमाणे महापालिकेसह खासगी संस्थांकडून स्वयंचलित/लहान बोटीही पुरवण्यात येत आहेत. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) कॉलेजांतील सुमारे ९०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ४०० विद्यार्थी, नागरी संरक्षण दलाचे १५०० स्वयंसेवक, स्काऊट व गाइडचे ३०० विद्यार्थी, सुमारे १ हजार ५७० वाहतूक रक्षक तसंच विविध सामाजिक-आध्यात्मिक संघटनांचे स्वयंसेवकही अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि पादचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता पोलिसांना मदत करणार आहेत. 

पुलांवरून सांभाळून 

मुंबईतील रेल्वे मार्गावरील १९ पूल धोकादायक आहे. त्यामुळे जुन्या पुलावरून विसर्जनावेळी जाताना गटागटानं जावं. जेणेकरून पुलावर एकाचवेळी १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही. पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाच-गाणी करू नये. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली आल्यावर घ्यावा. पुलावर जास्त वेळ थांबू नये. पुलावरून त्वरित पुढं जावं. पोलीस, महापालिका यांनी दिलेल्या सूचनेनुसार ये-जा ठेवावी, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. 

धोकादायक पुलांची नावे पुढीलप्रमाणे: 

मध्य रेल्वे 

  • घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
  • करीरोड
  • चिंचपोकळी (ऑर्थर रोड)
  • भायखळा 

पश्चिम रेल्वे 

  • मरिन लाइन्स
  • ग्रॅण्ट रोड - फेरर रेल्वे पूल
  • सँडहर्स्ट पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
  • फ्रेंच रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
  • केनडी रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
  • फॉकलंड रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
  • बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ
  • महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज
  • प्रभादेवी-कॅरोल
  • टिळक पूल, दादर
  • वीर सावरकर पूल (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये)
  • सुधीर फडके पूल, बोरिवली
  • दहिसर पूल
  • मिलन पूल, सांताक्रूझ
  • विलेपार्ले पूल
  • गोखले पूल, अंधेरी



हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेमार्गावरील जलद लोकल धिम्या मार्गावरून धावणार

गणेशोत्सव २०१९: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी जुन्या पुलावरून लवकर जावं- महापालिकेचं आवाहन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा