Advertisement

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेमार्गावरील जलद लोकल धिम्या मार्गावरून धावणार

गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनं अनंत चतुर्दशीला जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेमार्गावरील जलद लोकल धिम्या मार्गावरून धावणार
SHARES

अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभरातील अनेक गणेश भक्त लालबाग, गिरगाव आणि दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. तसंच, ज्या भक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं नाही, ते भक्त लालबाग परिसरात मोठी गर्दी करतात. बाप्पाच्या विसर्जनानंतर अनेक गणेशभक्त रेल्वेनं प्रवास करतात. त्यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनं अनंत चतुर्दशीला जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.


धिम्या मार्गावर धावणार

गणेश विसर्जना दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी ५ ते ८.३० या कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरील स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. त्यानुसार, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स, चर्चगेट या स्थानकांवर सर्व लोकल थांबणार आहेत.


प्रवाशांना दिलासा

गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येत नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेनं लोकल धिम्या स्थानकांवर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा -

दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान ईव्हीएमविरोधाचा एल्गार

गणेशोत्सव २०१९ : सामाजिक एेक्य जपणारा 'उमरखाडीचा राजा'Read this story in English or हिंदी
संबंधित विषय