Advertisement

गणेशभक्तांसाठी खूशखबर! यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद

‘अशी’ नोंदवा ऑर्डर

गणेशभक्तांसाठी खूशखबर! यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद
SHARES

संपूर्ण देशभरातून लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी भाविक येत असतात. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

लालबागच्या राजाच्या दर्शनाप्रमाणेच प्रसादालाही फार महत्त्व आहे. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऑनलाईन प्रसादाची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रसादाच्या ॲार्डर करीता https://lalbaugcharaja.com/online-prasad/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येणार नाहीय, त्यांना लालबागच्या राजाच्या प्रसादाची चव मात्र चाखता येणार आहे. मुंबईसह संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर प्रसाद पोहोचवण्यासाठी जिओ मार्ट आणि पेटीएम यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी प्रसाद पोहोचवण्याची सुविधा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले, "आम्हाला आनंद आहे की दोन वर्षानंतर गणेशभक्त मंडळाला भेट देऊ शकतील आणि 1.2 कोटीहून अधिक गणेशभक्तांनी भेट द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. देशभरातील गणेशभक्त पेटीएम अॅपवर देणगी देऊ शकतात आणि देणगीचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जाईल.”

पेटीएम सुपर अॅपद्वारे ड्राय फ्रूट प्रसाद देशात कुठूनही ऑर्डर केला जाऊ शकतो आणि 2 ते 5 दिवसात प्रसाद वितरित केला जाईल. हा प्रसाद 250 ग्रॅमसाठी 400 रुपयांना मागवता येतो. ऑर्डर करण्यासाठी पेटीएम अॅप होम पेजवर गणेश उत्सव आयकॉनवर क्लिक करा.

भाविकांना लालबागचा राजा येथून ऑनलाइन प्रसाद मागवू शकतात. जिओ मार्ट आणि पेटीएमच्या सहकार्याने मंदिराकडून ऑनलाइन ऑर्डरद्वारे भक्तांच्या दारापर्यंत प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे.

JioMart वरील प्रसाद लाडूंच्या स्वरूपात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार पेटीएमद्वारे, 250 ग्रॅम ड्रायफ्रूटच्या स्वरूपात हा प्रसाद देशभरातील आणि परदेशातील भाविकांना उपलब्ध होईल.

हे कसे कार्य करते?

कंपनीने बोर्डला भेट देणाऱ्या नवीन वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर सुरू केल्या आहेत. पेटीएम अॅप डाउनलोड केल्यानंतर, नवीन वापरकर्ते लालबागच्या राजा मंडळातील QR कोड स्कॅन करून INR 51 दान करू शकतात आणि त्यांना त्याच रकमेच्या कॅशबॅकसह प्रसादाचे लाडू मिळतील.

नवीन वापरकर्ते जे मंडळाला भेट देऊ शकत नाहीत ते ऑनलाइन प्रसाद मागवू शकतात आणि त्यांना INR 51 कॅशबॅक देखील मिळेल. पेटीएम अॅपवर दिवसभरात सर्वाधिक देणगी देणाऱ्या वापरकर्त्याला खास व्हीआयपी दर्शनासाठी 'कपल एन्ट्री' पास मिळतील.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भाविक JioMart वर दोन लाडूंचा प्रसाद मागवू शकतात. JioMart फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे क्षेत्रासाठी प्रसाद ऑर्डर वितरित करेल.

पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, “QR आणि डिजिटल पेमेंटमध्ये अग्रणी म्हणून, आम्ही महाराष्ट्रात आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. लालबागच्या राजा उत्सव समितीसोबतच्या आमच्या सहकार्याचा उद्देश महाराष्ट्रातील लोकांशी सखोल संबंध निर्माण करणे आणि सणासुदीच्या हंगामासाठी आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी नवीन सुरुवात करणे हे आहे.”



हेही वाचा

Mumbaicha Raja Ganpati: 'मुंबईचा राजा' काशी विश्वनाथ मंदिरात विराजमान

लालबागचा राजाला नवसाला पावणारा बाप्पा का म्हणतात? जाणून घ्या कथा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा