Advertisement

यंदा तुम्ही खेळलात का 'सायलेंट गरबा'?


यंदा तुम्ही खेळलात का 'सायलेंट गरबा'?
SHARES

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचं द ब्रेकअप साँग तर प्रत्येकाच्या लक्षात असेलच...त्या गाण्यात रणबीर आणि अनुष्का हेडफोन लावून डान्स करतात, तशीच क्रेझ सध्या नवरात्रीत पाहायला मिळत आहे. नवरात्रीत गाण्यांच्या तालावर रासगरबा आणि दांडियावर थिरकायला कुणाला नाही आवडत? पण नाचताना अनेकदा वेळेचे भान राखले जात नाही. पण आता यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी सायलेंट गरब्याची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या आवडत्या गाण्यावर हेडफोन सेट करून त्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज न करता गरबा खेळणे हा सध्याचा नवा ट्रेंड आहे. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत गरबारसिक अशा प्रकारे गाण्यांवर मनमुराद ठेका धरतात!



मुंबईतल्या बोरिवली, मालाड, अंधेरी, ठाणे अशा अनेक ठिकाणी सायलेंट गरब्याचा बोलबाला आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये ९ दिवस, तर मालाडच्या राजमहल बॅन्क्वेट्स इथे ११ दिवस गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळणाऱ्यांना ब्ल्यूटूथ हेडफोन देण्यात येतो. हेडफोनला तीन म्युझिकल ट्रॅक दिले आहेत. यात बॉलिवुड गरबा गाणी, पारंपरिक गुजराती गरबा गाणी आणि फ्युजन ट्रॅक अशा विविध प्रकारच्या संगीतावर नाचता येते. त्यामुळे कोणालाही डिस्टर्ब न करता तुम्ही आवडीच्या गाण्यावर नाचू शकता.


मला ही संकल्पना 'ए दिल है मुश्कील' चित्रपट पाहून आली. ही संकल्पना आजपर्यंत कुणी राबवली नव्हती. जवळपास चार महिने आम्हाला या गरब्याच्या तयारीसाठी लागले. 'वक्त्रा' कंपनीकडून आम्ही हेडफोन्स मागवले आहेत. आमच्या या संकल्पनेमुळे गरबा रसिक रात्री १० ते २ वाजेपर्यंत खरबा खेळण्याचा आनंद घेतात.

अबोली अंबर्डेकर, आयोजक, राजमहल बॅन्क्वेट्स, मालाड


या संकल्पनेमुळे गरबा रसिकांना गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटता तर येणार आहेच, शिवाय हेडफोन लावून गरबा खेळल्याने ध्वनिप्रदूषणापासून सुटकाही होणार आहे. त्यामुळे भावी काळात सायलेंट गरबा सुपरहिट ठरणार यात काही शंका नाही!

कव्हर फोटो सौजन्य



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा