Advertisement

शिवाजी पार्कात घरगुती गणपतीसाठी पार्किंगची व्यवस्था


शिवाजी पार्कात घरगुती गणपतीसाठी पार्किंगची व्यवस्था
SHARES

दादर चौपाटी तसेच महापौर निवासस्थानाजवळील कृत्रिम तलावात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. या गणेशभक्तांच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये याकरीता शिवाजी पार्कमध्ये वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे परिसरातल्या रस्त्यांवरील ताण हलका होण्यास मदत झाली आहे.दादर चौपाटीवर दादरसोबतच माहीम, माटुंगा, परळ, धारावी, करी रोड परिसरातून मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. मोठ्या आकाराच्या मूर्ती प्रामुख्याने दादर चौपाटीवर, तर लहान आकाराच्या मूर्ती महापौर निवासस्थानाजवळील कृत्रिम तलावावर विसर्जित करण्यात येत आहेत.दादर पोलिसांनी शिवाजी पार्कमध्ये छोटी मंडळे आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केल्याने परिसरातील वाहतूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा