Advertisement

कार्यकर्त्यांची मुजोरी थांबणार कधी?


SHARES

गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळात गडबड झाली नाही असं सहसा होत नाही. हे वर्ष देखील त्याला अपवाद नाहीये, लालबाग मध्ये ड्युटी करत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या धक्काबुक्कीनंतर आता मंडळाच्या कार्यकर्त्याने चक्क ऑन ड्युटी पोलिसाचा शर्ट पकडण्याचा प्रकार घडलाय. मात्र पीएसआयचा शर्ट पकडणं या कार्यकर्त्याला चांगलंच महागात पडलं..पीएसआय सत्यवान पवार यांनी लागलीच त्या कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली..पीएसआय सत्यवान पवार हे शनिवारी लालबागचा राजा च्या ड्युटीवर होते, एकीकडे भाविकांची गर्दी  वाढत होती तर दुसरीकडे पोलिसांवर हि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी दबाव वाढत होता.  त्यातच आपल्या माणसांना आत सोडण्यासाठी एका कार्यकर्त्याने पीएसआय सत्यवान पवार यांच्यावर मागून हात टाकला..आधीच आवाक्याबाहेरच्या गर्दीमुळे त्रस्त झालेल्या पवार यांनी कार्यकर्त्याच्या या घुसखोरीला लागलीच उडवून लावलं..हा कार्यकर्ता आक्रमक होताच पवार यांनी थेट त्याच्या कानशिलात लगावली..हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे..यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय..या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अद्याप कोणतीही केस नोंद केलेली नाही..लालबाग मंडळानं मात्र पोलिसांवरच पीएसआयला पाठीशी घालण्याचा आरोप केलाय..एवढंच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचा देखील कांगावा मंडळाने केला आहे. दिवसेंदिवस लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरीची प्रकरणं बाहेर येत असताना पोलीस यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सचिन गाड, मुंबई लाईव्ह   

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement