पोस्टातल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी सोन्याची

 Borivali

See all

बोरिवली - पोस्टातल्या कर्मचाऱ्यांचा संप 25 वर्षानंतर अखेर मिटला आहे. मात्र या कालावधीत अविरतपणे हा फंड सुरू ठेवला आणि आज या फंडाची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते लाभांश म्हणून दोन ग्रॅम सोन्याची भेट रौप्य महोत्सवी वर्षात देण्यात आली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांची खरी सोन्याची दिवाळी असंच वर्णन करावं लागेल.

1991मध्ये साली बोरिवली पूर्वेच्या मुख्य डाक घरातल्या संपावरचे कर्मचारी पोस्टात आले. त्यावेळी पोस्टमास्तरांनी त्यांना पोस्टात बसण्याची परवानगी नाकारल्यानंतर बाजूच्या अंबामाता मंदिरामागच्या मैदानात सारे पोस्टचे कर्मचारी जमले. वसंत घडशी यांच्या सुपीक डोक्यातून ‘कामगार कल्याण फंडाची कल्पना बाहेर आली. कर्मचाऱ्यांनी किडूक मिडूक गोळा करून हा फंड’ सुरू केला. त्यानंतर अडल्या नडलेल्यांना या फंडातून आर्थिक मदत करण्यात येऊ लागली.

Loading Comments