प्रतीक्षानगरमध्ये गुढीपाडव्याची स्वागत यात्रा

Pratiksha Nagar
प्रतीक्षानगरमध्ये गुढीपाडव्याची स्वागत यात्रा
मुंबई  -  

सायन - प्रतिक्षानगरमधील ए.बी.सी ग्रुपच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आली. यात विभागातील लहान मुलांसह तरुण, तरुणी आणि जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

कै. अशोक पिसाळ मैदानातून या शोभायात्रेला सुरुवात झाली. विभागातील नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्याहस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर ढोल पथकही पाडव्याची शोभा यात्रा उत्साहपूर्वक करण्यासाठी सज्ज होते. नऊवारी, फेटे, कपाळावर चंद्रकोर अशा पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत विभागातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.