Advertisement

फटाके उडवताना अशी घ्या काळजी


फटाके उडवताना अशी घ्या काळजी
SHARES

दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवताना जरा काळजी घेणं देखील आवश्यक आहे. फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

१) दिवाळीत घरोघरी पणत्या आणि दिवे लावले जातात. हे दिवे लावताना ते कागद, कपडे, लाकूड किंवा ज्वलनशील वस्तूंच्या आसपास तर नाहीत ना, याची खबरदारी घ्यावी.

२) शक्यतो फटाके उडवणे टाळावेच, पण तरीही ते उडवायचेच असल्यास घरापासून दूर मोकळ्या जागेत जाऊन उडवावेत.

३) लहान मुले फटाके उडवत असताना मोठय़ांपैकी कुणीतरी त्यांच्याबरोबर असावे. पायांत चपला घातल्याशिवाय फटाके उडवू नयेत.

४) फटाके उडवायला जाताना बरोबर पाणी किंवा वाळू भरलेली बादली न्यायला विसरू नका. जवळ प्रथमोपचार पेटीही हवीच.

५) अडचणीच्या जागी रॉकेटसारखे फटाके उडवू नका. विद्युत तारांजवळ किंवा घराच्या उघड्या खिडक्यांजवळ फटाके उडवणे धोकादायक ठरू शकते.

६) फटाके उडवताना कपडय़ांकडेही लक्ष हवे. अशा वेळी अंगाबरोबर बसणारे आणि शक्यतो सुती कपडेच घाला. घोळदार, नायलॉनचे कपडे फटाके उडवताना नकोत.

७) फुलबाज्या उडवून झाल्यावर त्याच्या काडय़ा एका बाजूला एकत्र कराव्या. फुलबाजीच्या काडय़ा धातूच्या असल्यामुळे त्या बराच वेळ गरम राहतात. त्या इथे- तिथे पडल्यास त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते.
फटाके उडवून झाल्यावर ते उडवलेले फटाकेही एका बाजूला सारून ठेवावेत.

८) खूप मोठा आवाज सतत कानावर आदळल्यामुळे ऐकू येण्याची शक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच निद्रानाशासंबंधीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न उडवणे आपल्याच हातात आहे.

९) फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.

१०) गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेलं असतं. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.

११) विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा.

फटाके उडवताना दुर्घटना घडलीच तर हे उपाय करा

१) दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा.
२) भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.
३) जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं.
४) जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.



हेही वाचा

दिवाळीत मिठाई खाताय? मग 'असा' ओळखा मिठायांवरील भेसळयुक्त चांदीचा वर्ख

घरातील वस्तू वापरून अशी रेखाटा सुरेख रांगोळी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा