महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रथयात्रा

 Borivali
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रथयात्रा
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रथयात्रा
See all

बोरीवली पश्चिम - एक्सर रोड आणि योगीनगर मध्ये वाल्मिकी सेवा संघ यांच्यावतीनं महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश होता. महर्षी वाल्मिकीचं महत्त्व समाजाला आणि भावी पिढीला समजावं हा या रथयात्रेमागचा उद्देश होता. ढोल ताशाच्या गजरात ही रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेतून रामायणही मांडण्यात आलं. रामाच्या जीवनाची कथा या रथयात्रेतून मांडण्यात आली. रथयात्रेनिमित्त लहान मुलांनी राम-सीता,शंकर-पार्वती यांची रुप घेतली होती.

Loading Comments