साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे आयोजन

 Prabhadevi
साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे आयोजन

प्रभादेवी - श्री साईभक्त मंडळाच्यावतीने साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या 99 व्या साईबाबा महासमाधी शताब्दी वर्षाचे दुसरे संमेलन 14 आणि 15 ऑक्टोबर 2017 ला होणार आहे. या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी रविवारी 19 मार्चला सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री सिद्धिविनायक मंदिर भोजनालय बिल्डिंग येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाने दिली आहे.

गेल्यावर्षी 98 वे साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलन 15 आणि 16 ऑक्टोबरला वरळी येथील जांबोरी मैदान येथे झाले होते. सर्वधर्मियांची श्रध्दा असलेल्या साईबाबांना वंदन करण्यासाठी त्यावेळी भाविकांनी जांबोरी मैदानात मोठी गर्दी केली होती.

Loading Comments