बाजार उजळला पणत्यांनी

 Mumbai
बाजार उजळला पणत्यांनी
बाजार उजळला पणत्यांनी
बाजार उजळला पणत्यांनी
बाजार उजळला पणत्यांनी
See all

 भोईवाडा- दीपोत्सव म्हणजेच प्रकाशमय दिव्यांचा उत्सव. हा उत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. परळ - भोईवाडा इथल्या बाजारातही विविध प्रकारच्या आणि आकाराच्या पणत्या दाखल झाल्यात. अगदी 10 रुपयांपासून 500 रुपये किंमतीपर्यंत पणत्या आणि पणत्यांचा सेट उपलब्ध आहे. मातीच्या, चिनी मातीच्या, पत्र्याच्या, काचेच्या, मेणाच्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या पणत्या बाजारात आहेत. पणत्यांवर कुंदन, डायमंड, काच टिकल्या लावून त्या अधिक आकर्षक बनवण्यात आल्यात. तर कोयरी, हत्तीच्या आणि मटक्याच्या आकाराच्या लहान, मोठ्या पणत्या ग्राहकांच्या जास्तीस पसंतीस पडत असल्याचं विक्रेत्या साधना राऊळ यांनी सांगितलं.

Loading Comments