Advertisement

अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचं दर्शन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचं दर्शन
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या आणि या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. 

यंदा २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीला  सिद्धिविनायक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना वाढीचा धोका लक्षात घेऊन भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे त्यांनादेखील सकाळी ८  ते रात्री ९ दरम्यानच दर्शन घेता येणार आहे.

ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. तसंच ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड आहे त्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तसंच हा क्यआर कोड अहस्तांतरणीय असून व्हॉट्सअॅपद्वारे, फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉटद्वारे क्यूआर कोडची प्रत स्वीकारली जाणार नाही. क्यआर कोड अहस्तांतरणीय असून व्हॉट्सअॅपद्वारे, फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉटद्वारे क्यूआर कोडची प्रत स्वीकारली जाणार नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा