शोभायात्रेतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

 Mumbai
शोभायात्रेतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
Mumbai  -  

फोर्ट - फोर्ट येथील संजीवनी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शोभायात्रेत मराठमोळया संस्कृतीच दर्शन घडले. फोर्ट येथील कबुतर खाना येथून सकाळी 8 वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली.

यंदा संजीवनी प्रतिष्ठानच्या शोभायात्रेच 4 थे वर्षे होते. ही शोभायात्रा जीपीओ सर्कल, शहीद भगतसिंग मार्ग, बोराबाजार ते पुन्हा कबुतरखाना अशी काढण्यात आली. जवळपास 1 हजारांहून अधिक आबालवृध्द, स्त्रिया,पुरुष,तरुणाई पारंपारिक वेशभुषा करून यात्रेत सहभागी झाले होते.

दरम्यान कुलाबा येथील बंजरंग दल आयोजित नववर्ष शोभायात्रेतील चित्ररथातून अखंड भारतमातेच दर्शन घडणार आहे. या शोभायात्रेत वाल्मिकी समाज, हरे राम हरे कृष्णा ग्रुपचे सदस्य सहभागी होणार आहेत. दरवर्षी शोभायात्रेतून टेम्पोतून चलचित्र दाखवण्यात येतात. मात्र सध्या कुलाबा परिसरात सुरू असलेल्या मेट्रो 3 च्या कामामुळे यंदा बैलगाडीतून चलचित्र दाखवण्यात येणार आहे.

संध्याकाळी 4 वाजता या शोभायात्रेला कुलाबा पोलीस स्टेशन येथून सुरुवात होणार आहे. कुलाबा पोलीस स्टेशन ते कफ परेड, प्रेसिडेंट हॉटेल, भदवार पार्क, तवार कॅम्प, ससून डॉक, कुलाबा मार्केट ते हनुमान मंदिर असा शोभायात्रेचा मार्गक्रमण असेल. रात्री 10 वाजता ही शोभायात्रा हनुमान मंदिर परिसरात संपन्न होईल. भजन, कीर्तन व झांजच्या गजरात ही शोभायात्रा मार्गस्थ होईल.

Loading Comments