Advertisement

... म्हणून साजरा होतो ख्रिसमस


... म्हणून साजरा होतो ख्रिसमस
SHARES

डिसेंबमध्ये ख्रिसमस, न्यू ईअरची धमाल असते. ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी अनेकजण बाहेरगावी जाण्याचे प्लॅन्स करतात. पण ऑफिस असल्यामुळे अनेकांना ही मजा अनुभवता येत नाही. पण हल्ली ऑफिसेसमध्ये देखील ख्रिसमस साजरा करण्याचा एक नवाच ट्रेंड आला आहे. अनेक ऑफिसेसमध्ये सिक्रेट सँटा (Secret Santa) हा गेम खेळला जातो.

लोकांनी एकत्र येणे, एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद शेअर करणे हाच यामागचा हेतू असतो. यानिमित्तानं ऑफिसमधील नेहमीच सिरियस असणारं वातावरण मजेशीर होतं. पण सिक्रेट सँटाचा इतिहास काय आहे? आणि हा खेळ कोणी सुरु केला हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आम्ही तुम्हाला या संदर्भातच माहिती देणार आहोत.


कुठून आली ही संकल्पना?

सिक्रेट सँटाची संकल्पना म्हणजे कुणाकडून तरी अनामिक भेटवस्तू मिळणं. युरोपमधील स्कँडिनेव्हिया (Scandinavia) इथं या संकल्पनेचे मूळ आहे. याला ज्यूलक्लॅप (Julklapp) असंही म्हणतात. या शब्दाची फोड केल्यास "Jul" म्हणजे 'ख्रिसमस' (Christmas) आणि "Klapp" म्हणजे 'ठोठावणे' (to knock). याचाच अर्थ दरवाजा कोणीतरी ठोठावून गिफ्ट देऊन निघून जातं. ही कल्पना सेंट निकोलस आणि कन्च रूपर्ट (Knecht Rupert) यांची होती.

सेंट निकोलस घरोघरी जाऊन लहान मुलांच्या वागणुकिबद्दल त्यांच्या आई-वडिलांना विचारत. जर मुलांची वागणूक चांगली असेल तर त्यांना गिफ्ट दिलं जाई. त्यावेळी सेंट निकोलस यांच्यासोबत कन्च रूपर्ट घरोघरी जावून गिफ्ट देण्यास मदत करत असतं. हे गिफ्ट आपल्याला कोणी दिलंय याची हिंट त्यावर लिहिलेल्या छोट्याशा गंमतीशीर मेसेजमध्ये असे. ही गंमतीशीर संकल्पना पुढे वाढत गेली आणि परंपराच झाली. यात गिफ्ट मिळण्याची उत्सुकता आणि आनंद दडलेला आहे. त्याचबरोबर गिफ्ट घेण्यात जितका आनंद आहे तितकाच तो देण्यातही आहे हा छुपा संदेश यामागे आहे.


पहिला सिक्रेट सँटा?

लॅरी डीन स्टीवर्ट (Larry Dean Stewart) हा अमेरिकन शुभचिंतक होता. तो कॅन्सस शहराचा (Kansas City) सिक्रेट सँटा म्हणून ओळखला जायचा. त्यानं गरीब, दुबळ्यांना लहान लहान गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली आणि प्रेम, दयाभाव याचा प्रचार करु लागला. हे सर्व कोणालाही कळू न देता गुप्तपणे करण्याकडे स्टीवर्टचा कल होता आणि त्यात तो यशस्वीही झाला. कोणालाही कळालं नाही की ही गिफ्ट्स कोणी दिली आहेत. मात्र 2006 मध्ये जेव्हा त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं तेव्हा त्याची ओळख जगासमोर आली. स्टीवर्टचा दयाभाव फक्त कॅन्सस शहरापर्यंतच नाही तर संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये पसरला. या सिक्रेट सँटाचा 2007 मध्ये अंत झाला. स्टीवर्टच्या दयाभावाचे प्रतिक म्हणून सिक्रेट सँटा हा खेळ सर्वत्र खेळला जातो.



हेही वाचा-

वरळीत सजला ६५ फूट उंच ख्रिसमस ट्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा