Advertisement

...यांचा घरगुती बाप्पा झाला 101 वर्षांचा


...यांचा घरगुती बाप्पा झाला 101 वर्षांचा
SHARES

सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाला 100 वर्ष किंवा 50 वर्षे पूर्ण झाल्याचे आपण आजवर अनेकदा ऐकले असेलच. पण एखाद्या घरगुती बाप्पाला शंभरपेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? विश्वास बसत नसेल ना? पण एका घरगुती बाप्पाला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. तेही आपल्या मुंबईच्या दादर परिसरात!


नेमका कोणाचा आहे हा बाप्पा?

हा बाप्पा आहे राणेंचा...अहो नारायण राणे नाहीत. हे राणे जरी मूळचे कोकणातले असले, तरी त्यांचे पूर्ण नाव सुरेश राणे आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. मात्र सुरेश राणे यांचे कुटुंब त्यांच्या आजोबांपासून ते आता त्यांच्या नातीपर्यंत मुंबईत त्यांच्या दादरच्या घरीच बाप्पा बसवतात.



कधी आला राणेंचा पहिला गणपती?

1916 साली त्यांच्या आजोबांनी बाप्पाची मूर्ती पहिल्यांदा घरात आणली. सुरुवातीपासूनच गौरी गणपती असल्यामुळे तेव्हा पासून ते आतापर्यंत ते बाप्पाची मनोभावे पूजा करतात. विशेष म्हणजे सुरेश राणे यांची छोटी नात देखील आता हा वसा पुढे नेत आहे.

1916 साली आजोबांनी बाप्पाची मूर्ती पहिल्यांदा आमच्या घरी आणली. 1964 साली आजोबा गेल्यानंतर मीच सगळे बघत आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून आम्ही इकोफ्रेंडली गणपतीला महत्त्व दिले आहे.

सुरेश राणे



हेही वाचा - 

यावर्षी बसवा 'स्मार्ट' बाप्पा!

अंध मुलामुलींनी साकारला बाप्पासाठी सेट!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा