• जय हिंद महाविद्यालयात 'तलाश' महोत्सव
  • जय हिंद महाविद्यालयात 'तलाश' महोत्सव
  • जय हिंद महाविद्यालयात 'तलाश' महोत्सव
SHARE

चर्चगेट - कॉलेज विश्वात नावाजलेला महोत्सव असं लौकीक मिळवलेल्या 'तलाश -2016'ची शानदार सुरुवात शनिवारपासून जय हिंद महाविद्यालयात झाली. यंदा या महोत्सवाचं 17 वे वर्ष असून गेल्या 16 वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपलाय. या वर्षी 'तलाश'ची थीम थोडी हटके आहे. या महोत्सवात मुंबई आणि आसपासचे एकूण 25 पेक्षा जास्त महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या महोत्सवाचे संयोजक डॉ. राखी शर्मा आहेत. शनिवारी आणि रविवार 12 प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. ज्यात "अवर टू पॉवर", ट्रॅव्हलर्स बॅग पॅक, फोटोग्रफी, पिच्ड इट अप, एक्सपोर्ट-इंपोर्ट्स, बिल्ड युवर एम्पायर, क्रॉस एग्जेमिनेशन, बॅण्ड शो यांसारख्या धमाकेदार इव्हेंट्सनी तमाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेड लावून सोडलं. महोत्सवाची सुरुवात ही 'अवर टू पॉवर' ने झाली. ज्यात व्यवस्थापनावर आधारित गेम्स होते, ते विद्यार्थ्यांच्या पसंतीसही उतरले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या