Advertisement

अन् थायलंडच्या भाविकांनीही केलं बाप्पाचं विसर्जन


अन् थायलंडच्या भाविकांनीही केलं बाप्पाचं विसर्जन
SHARES

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जिथं लाखोंचा जनसमुदाय साश्रू नयनांनी लाडक्या गणरायाला निरोप देत होता, तिथंच मुंबईत पर्यटनासाठी दाखल झालेल्या थायलंडच्या भाविकांनीही बाप्पाचं विसर्जन करून सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा(एमटीडीसी)तर्फे गणेश विसर्जन सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी परदेशी पर्यटकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात थायलंडच्या (गणेश म्युझियम) ५५ पर्यटकांचाही समावेश होता.

या पर्यटकांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. इतर पर्यटकांसोबत गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर या भाविकांनी आरती म्हणत, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात बाप्पाचं विसर्जन केलं.

'एमटीडीसी'ने ५ सप्टेंबरला गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळा परदेशी पर्यटकांना पाहता यावा, यासाठी महापालिकेच्या सहकार्यानं खास गॅलरी बांधली होती. या गॅलरीत बसून अमेरिका, युरोप, थायलंड आणि जपानहून आलेल्या ३०० हून अधिक पर्यटकांनी हा विसर्जन सोहळा पाहिला.

या गॅलरीत वाय-फाय, मोबाईल टॉयलेट्स, पाण्याची सुविधाही पुरविण्यात आली होती. पर्यटकांनी विसर्जन सोहळ्याचा आनंद घेत वाय-फाय सुविधेद्वारे आपला अनुभव लगेच इतरांसोबत शेअर केला. मागील १२५ वर्षांत गणेशोत्सव कशा प्रकारे बदलत गेला, हे देखील या गॅलरीत दाखविण्यात आलं होतं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा