दिशा फाउंडेशनकडून धान्य वाटप

 BMC office building
दिशा फाउंडेशनकडून धान्य वाटप

परळ - दरवर्षीप्रमाणे यंदाही पितृपक्षात दिशा फाउंडेशनच्या वतीने रुग्णांसाठी धान्य वाटपाचा उपक्रम राबवला जात आहे. परळच्या सोशल सर्व्हिस लीग या शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत दर दिवशी सुमारे 25 ते 50 रुग्णांना 3 किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळीची वाटप केली जात आहे.

2003 पासून दिशा या संस्थेने शिदोरी हा प्रकल्प सुरू केला. या उपक्रमांतर्गत बाहेरगावातून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिशा कार्यालयात दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता 3 किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळ दिली जात आहे. आपणही या उपक्रमात सहभागी होऊया या उद्देशाने सुरेखा पेंडूरकर यांनी 2 हजार रुपये, प्राची तुळसकर यांनी एक हजार रुपये, अनिल तावडेंनी हजार रुपये, सुबोध तावडेंनी दीड हजार तर काही नागरिकांनी धान्य देऊन दिशा फाउंडेशनच्या शिदोरी या प्रकल्पाला मदतीचा हात दिला आहे.

Loading Comments