Advertisement

अनोख्या पद्धतीने 'नवदुर्गा पूजन'


अनोख्या पद्धतीने 'नवदुर्गा पूजन'
SHARES

एड्स संदर्भात जनजागृती अभियान राबवणाऱ्या सोशल अॅक्टिव्हीटीज इंटिग्रेशन (साई) संस्थेतर्फे शुक्रवारी “नवदुर्गा पूजन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सोशल अॅक्टिव्हीटीज इंटिग्रेशन या संस्थेतल्या मुलींनी इतिहासातील महत्त्वाच्या महिलांची माहिती करून दिली. यामध्ये जिजाऊ माता, राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर, डॉ आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, नीरजा भानोत, इंदिरा गांधी, पी. टी. उषा या महिलांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वैदू समाजातील सामाजिक कार्यकर्त्या ‘दुर्गा गुडुलू’ यांच्या हस्ते झाले. त्यांनी या इतिहासातील अन्यन्यधारण व्यक्तिमत्व ‘अहिल्याबाई होळकर’ या विषयावर मुलांना माहिती दिली.

राष्ट्रानिर्माणमध्ये जिजाऊ माता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, डॉ आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, नीरजा भानोत, इंदिरा गांधी, पी. टी उषा या महिलांनी स्वतःचे आयुष्य झोकून दिले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सामाजिक कार्य करत आहे. तुम्ही देखील असेच राष्ट्र निर्माणामध्ये स्वतःला झोकून द्या.
- दुर्गा गुडुलू, सामाजिक कार्यकर्त्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा