Advertisement

'या' आऊटलेटमध्ये घ्या फ्री नाचोसचा आस्वाद


'या' आऊटलेटमध्ये घ्या फ्री नाचोसचा आस्वाद
SHARES

नाचोस हा पदार्थ तसा मॅक्सिकन. पण भारतातदेखील नाचोस हा पदार्थ खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. मला खात्री आहे नाचोसचं नाव घेताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. कल्पना करा की हे नाचोस तुम्हाला फ्री खायला मिळाले तर? तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे


ओनली फ्री नाचोस

घाटकोपरमध्ये 'न्यू बरीतो कंपनी'चे नवीन आऊटलेट ओपन झाले आहे. या निमित्त तुम्हाला २५ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी विनामुल्य नाचोस खाण्याची संधी मिळणार आहे. मुळचा मॅक्सिकन पदार्थ असला तरी खास करून मुंबईकरांच्या चांगलाच पसंतीस उतरलाकुरकुरीत नाचोस आणि सोबतीला सॉस... आहाहा... कधी न खाल्लेल्यांच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेलसर्वात महत्त्वाचं तुम्हाला या आऊटलेटमध्ये फक्त नाचोस फ्री मिळणार आहेत.



मॅक्सिकन तडका...

फक्त नाचोसच नाही तर इतर मॅक्सिकन पदार्थांचादेखील आस्वाद तुम्हाला घेता येणार आहेत. टाकोज, मॅक्सिकन क्रिमी पोटॅटोजटोफू अॅण्ड पोटॅटो असे अनेक प्रकार तुम्ही इथं चाखू शकता.



याशिवाय तुम्ही स्वत:चं मिलदेखील तयार करू शकता. स्वत:च्या मिलसाठी तुम्हाला ब्राऊन राईस, व्हाईट राईस, फजीट्सपीन्टो बीन्स आणि ब्लॅक बीन्स यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर सालसा दे क्युसो, सालसा वेरदे, सालसा रोजापीको दे गालो आणि सॉर क्रिम अॅण्ड मयोनिज यापैकी एक सॉस तुमच्या मिलसाठी निवडायचा आहे. सर्वात शेवटी क्रंची लेट्यूस, ग्रीन चिलीजजेलीपिनोज यापैकी एक अॅड करण्याचा पर्याय दिला जाईल



बरीतो कंपनीनं त्यांच्या मेन्यूमध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केला आहे. कॉर्न अॅण्ड पमकिन सूप आणि मॅक्सिकन पिझ्झा या दोन पदार्थांना मॅक्सिकन तडका देण्यात आला आहे. एकूणच मॅक्सिकन पदार्थांची हटके चव तुम्हाला इथं चाखता येणार आहे



तुम्हाला मॅक्सिकन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर घाटकोपरमधल्या बरीतो कंपनी या आऊटलेटला नक्की भेट द्या. सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत तुम्ही या आऊटलेटला भेट देऊ शकता.

कुठे : विक्रांत सर्कल, लोखीट को. .हाऊसिंग सोसायटी, शॉप नंबर १६, विक्रांत टिळक रोड, घाटकोपर

वेळ : सकाळी ११ ते रात्री ११



हेही वाचा

'घंटावाला पान मंदिरा'ला एकदा भेट द्याच




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा