ईदचा स्पेशल मेन्यू मिळणारी मुंबईतली ही पाच ठिकाणं!

 Mumbai
ईदचा स्पेशल मेन्यू मिळणारी मुंबईतली ही पाच ठिकाणं!

रमझान ईद म्हटलं की, डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे मित्र, नातेवाईकांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबतीला भरगच्च मेन्यू. शीरखुर्मा, दम बिर्यानी, मटन बिर्यानी, खिचडा असे अनेक पदार्थ ईदची खासियत आहेत. ही नावं ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? बहुतांश हे सर्व पदार्थ चाखण्यासाठी मुंबईकर मोहम्मद अली रोड, माहिमचा कापड बाजार या जागांना भेट देतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही जागा सांगणार आहोत, जिथे तुम्ही या सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.    

टाईम्स ऑफ बिर्यानी

अंधेरीतल्या चार बंगलो इथे असलेल्या 'टाईम्स ऑफ बिर्यानी' या हॉटेलमध्ये तुम्ही बिर्यानीचा आस्वाद घेऊ शकता. हैदराबादी बिर्यानी, मुगलाई मटन बिर्यानी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्यानी तर इकडची खासियत!

नूर मोहम्मदी

रमझानची खाद्ययात्रा भेंडी बाजार येथील नूर मोहम्मदीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या नावामुळे  नूर मोहम्मदी प्रसिद्धीस आले. अभिनेता संजय दत्त यानं स्वत:ची चिकनची रेसिपी नूर मोहम्मदी हॉटेलचे मालक खालिद हाकिम यांना दिली होती. त्यानंतर संजू बाबा नावानं हा पदार्थ या हॉटेलमध्ये विकला जाऊ लागला. याशिवाय चिकन हाकिमी आणि मटन निहारी हे पदार्थ इथली खासियत आहेत.

ढिशक्याव

नावाप्रमाणेच इथले पदार्थही हटके आहेत. चिकन आणि मटनमध्ये हटके आणि नवीन फ्लेवर चाखायचे असतील, तर तुम्ही वांद्रे-कुर्ला कॉम्प्लॅक्समधल्या ढिशक्यांव या हॉटेलला नक्कीच भेट द्या.  इथल्या काही शाकाहारी पदार्थांवर इंडोनेशिया आणि आफ्रिकन खाद्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. पायासामन शिखरोस्ट लँब भूना, बटर गार्लिक पाव हे पदार्थ इथली खासियत.

द बोहरी किचन

हिरव्या लसणाचा खिमा, चिकन-मटन समोसा, बोहरी बिर्यानी, डब्बा गोश्त, सली बोटी ही येथील खासियत. पाव हे 'द बोहरी किचन'मध्ये बनवले जातात. रोझ सरबत हे येथील खूप प्रसिद्ध असं पेय आहे

फरीद सिख कबाब सेंटर

जोगेश्वरीतल्या बेहराम बाग इथे फरीद सिख कबाब सेंटर फार प्रसिद्ध आहे. सर्व प्रकारचे कबाब तुम्ही इथे चाखू शकता. बोटी कबाब, सिख कबाब असे अनेक कबाब इथली खासियत आहेत.

Loading Comments