Advertisement

संजीव कपूर घेऊन येत आहेत कुकरी रिअॅलिटी शो


संजीव कपूर घेऊन येत आहेत कुकरी रिअॅलिटी शो
SHARES

स्वयंपाक करणंही इतकं ग्लॅमरस असू शकतं, हे भारतीयांमध्ये रुजवणारे शेफ म्हणजे संजीव कपूर! भारतामध्ये लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचलेला कुकरी शो 'खाना खजाना' ही संजीव कपूर यांची निर्मिती. 'खाना खजाना'च्या माध्यमातून सर्व खाद्य प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर पुन्हा एकदा संजीव कपूर एक नवा कुकरी शो घेऊन येत आहेत.

काही वर्षांपूर्वी आलेल्या 'फूड फूड' या चॅनलवर संजीव कपूर एक नवीन शो घेऊन येत आहेत. 'फूड फूड' या चॅनेलने खूप कमी वेळेत खवय्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. इटालियन, चायनिज, स्पॅनिश, भारतीय असे सगळे पदार्थ कसे बनवायचे? हे दाखवले जातात. इतर देशातल्या खाण्याच्या संस्कृती, तिथलं वेगळेपण जाणून घेण्यासाठी अनेक कुकरी शो चॅनलवर दाखवले जातात. यामध्ये आणखी एका शोची भर पडली आहे आणि तो म्हणजे 'कुक ऑफ’.



कसा असेल शोचा फॉरमेट?

फूड फूड या चॅनलवर प्रसारित होणारा 'कुक ऑफ' हा ३० मिनिटांचा शो असेल. या ३० मिनिटांमध्ये स्पर्धकांना त्यांच्या प्रतिस्पर्धींवर विजय मिळवायचा आहे. या शोमध्ये स्पर्धकांना त्यांचं कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एका विजयी स्पर्धकाची घोषणा केली जाईल. सर्व स्पर्धकांची निवड ही हॉटेल मॅनेजमेंट शिकवलं जाणाऱ्या कॉलेजमधून करण्यात येईल.

'कुक ऑफ’ या शोचे परीक्षक संजीव कपूर आहेत. तर या शोचं सूत्रसंचालन अमृता रायचंड करणार आहे. यासोबतच परिझाद झोराबीन, शरद केळकर, हरीहरन, रेणुका शहाणे असे अनेक नामांकित सेलिब्रिटीच पाहुणे कलाकार म्हणून या शोमध्ये सहभागी होणार आहेत.



कुक ऑफ या शोची संकल्पना हटके आहे. भारतात अशा संकल्पनेवर आधारीत पहिलाच रिअॅलिटी शो आहे. या शोद्वारे शेफचं कौशल्य, बांधिलकी आणि क्षमता याचं परीक्षण केलं जाईल. हा शो नक्कीच त्यांच्या कौशल्यात भर टाकेल, अशी खात्री शेफ संजीव कपूर यांनी व्यक्त केली.

दावत बासमती तांदूळ आणि टाटा संपन्न यांनी विबा आणि फूड फूड यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या शोचे प्रिमियर २६ जानेवारीला होणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा