SHARE

आतापर्यंत तुम्ही सोन्याचे दागिने पाहिले असतील. अगदी सोन्यापासून बनवलेल्या वस्तू पाहिल्या असतील. पण पहिल्यांदाच तुम्ही पाहणार आहात 'सोन्याचं आईस्क्रिम'. नाही नाही. गैरसमज करून घेऊ नका. सोन्याचे म्हणजे काय खऱ्या सोन्यापासून बनलेले नाही ओ. हे आईस्क्रिम आहे खाण्याच्या सोन्यापासून बनवलेलं. सध्या भारतात अशा पदार्थांचा ट्रेंडच सुरू आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे 'सोन्याचं आईस्क्रिम'.


सोन्याच्या आईस्क्रिमची खासियत

मुंबईतल्या जुहू तारा रोडवर 'हुबर अँड हॉली' नावाची एक आईस्क्रिम पार्लरची चेन सुरू झाली आहे. पार्लर सुरू होताच 'माईटी मिडास' नावाच्या डेझर्टसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं. माईटी मिडास म्हणजेच सोन्याचं आईस्क्रिम. या आईस्क्रिममध्ये एकूण १७ घटक आहेत. यासोबतच त्याच्यावर सोन्याचा वर्ख टाकण्यात येतो आणि यासाठीच ते प्रसिद्ध होत आहे.


'असे' बनते हे आईस्क्रिम

एक वॉफल कोनमध्ये ब्राऊनीचे तुकडे, बदाम, गरमागरम हॉट चॉकलेट फज टाकले जाते. त्याच्यावर गोल्डन चॉकलेट आईस्क्रीम टाकले आहे. या आईस्क्रीमवर अजून एक चॉकलेट आईस्क्रीमचा बार टाकला जाचो. या सगळ्यावर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख टाकण्यात येतो. या आईस्क्रीमचा एक कोन खाण्यासाठी तुम्हाला फक्त १००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.


हेही वाचा

आईस्क्रिमला महाराष्ट्रीयन तडका म्हणजे 'सिजलिंग पुरणपोळी'


संबंधित विषय
ताज्या बातम्या