कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात

 BDD Chawl
कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात
कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात
कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात
कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात
कोळी खाद्य महोत्सवाला सुरुवात
See all

वरळी- वरळी सी-फेसवर आयोजित केल्या जाणाऱ्या कोळी खाद्य महोत्सवाचे यंदा 4 थे वर्ष आहे. हा खाद्य महोत्सव 4 नोव्हेंबरपासून सुरु झाला असून 6 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तीन दिवसीय या खाद्य महोत्सवाचं आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आलं आहे. महोत्सवाच्या निमित्ताने वरळीकरांना विविध प्रकारच्या माशांच्या चवी चाखायला मिळणार आहेत. पहिल्याच दिवशी महोत्सवात विविध प्रकारचे मासे लोकांना खायला मिळाले. या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल्स पैकी काही स्टॉल्स मुंबई शहरातल्या विविध कोळीवाड्यातले असून काही महिला बचत गटाचे देखील आहेत. खाद्य महोत्सवात विविध प्रकारचे मसाले देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Loading Comments