Advertisement

झणझणीत मिसळ खायचीय? मग मुंबईतल्या 'या' फेस्टिव्हलला भेट द्या

कुठे मुगाची उसळ, तर कुठे वाटाण्याचा रस्सा. कुठे पोह्याचा चिवडा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवण्यात येणारी मिसळ सर्वांच्याच आवडीची. वेगवेगळ्या प्रकारे बनणाऱ्या प्रांतोप्रांतीच्या मिसळ एका ठिकाणी चाखण्याची संधी मुंबईत उपलब्ध झाली आहे. मुंबईत यात तुम्ही जवळपास राज्यभरातील १२ हून अधिक मिसळींचा आस्वाद घेऊ शकता.

झणझणीत मिसळ खायचीय? मग मुंबईतल्या 'या' फेस्टिव्हलला भेट द्या
SHARES

मिसळ हा अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ... पण मुंबईतून पुण्याला जा किंवा कोल्हापूरला गेलं तरी  मिसळीची चव बदलते. तिचा झणझणीतपणा, तर्रिबाजपणा कायम असला तरी, प्रत्येक प्रांतातल्या मिसळीत वैविध्य आढळतंच. कुठे मुगाची उसळ, तर कुठे वाटाण्याचा रस्सा. कुठे पोह्याचा चिवडा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवण्यात येणारी मिसळ सर्वांच्याच आवडीची. वेगवेगळ्या प्रकारे बनणाऱ्या प्रांतोप्रांतीच्या मिसळ एका ठिकाणी चाखण्याची संधी मुंबईत उपलब्ध झाली आहे. मुंबईत यात तुम्ही जवळपास राज्यभरातील १२ हून अधिक मिसळींचा आस्वाद घेऊ शकता


मिसळ खवय्यांचा जिव्हाळ्याचा विषय

हल्ली तर मिसळीसोबत अनेक प्रयोग केले जातात. व्हेज मिसळ यासोबतच नॉनव्हेज मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळींनी खवय्यांच्या जिभेसोबतच मनावर देखील ताबा मिळवला आहे. अशा ठिकठिकाणच्या मिसळींची चव एकाच ठिकाणी चाखता यावी, यासाठी मंबईतल्या अनेक भागांमध्ये मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. प्रत्येक भागातील खवय्यांकडून या महोत्सवांना चांगला प्रतिसाद देखील मिळतोगिरगावकरांसाठी खाद्य पर्वणी

गिरगावमध्ये दोन दिवसासाठी फूड फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस हा फूड फेस्ट भरणार आहे. या फेस्टची खासियत म्हणजे मिसळ पाव... कोल्हापूरची झणझणीत अशी कट मिसळ खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. फक्त व्हेजच नाही, तर इथं तुम्ही नॉनव्हेज मिसळींचा आनंद घेऊ शकता. फ्लेवर्स तर्फे चिकन खिमा मिसळ, तर जस्ट फ्राय इटतर्फे प्रॉन्स मिसळ, करंदी भाजी रस्सा पाव अशा हटके मिसळ खाण्याची संधी गिरगावकरांना मिळाली आहे७ एप्रिलला रात्री १० वाजेपर्यंत आणि रविवारी म्हणजेच ८ एप्रिलला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महोत्सव रंगणार आहेतुम्हाला देखील या मिसळींचा आस्वाद घ्यायचा असेल तर गिरगावच्या मुनभाट लेन इथल्या उरणकरवाडी पटांगणाला भेट द्या.


परळ-लालबाग मिसळ महोत्सव

गिरगावचा मिसळ महोत्सवाला हजेरी लावण्याची संधी हुकली असेल तर टेंशन घेऊ नका. गिरगावात १२ ते १५ एप्रिल असे चार दिवस तुम्ही मिसळ महोत्सवाचा आनंद घेऊ शकता. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ठाणे, डोंबिवली, मलुंड अशा अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवाला भरघोस यश मिळालंपरळ लालबाग आणि समस्त मुंबईकर खवय्यांना पुन्हा एकदा मिसळींवर ताव मारण्याची संधी मिळाली आहे. फक्त मिसळ महोत्सवच नाही तर शॉपिंग आणि लहान मुलांसाठी गेमझोन अशी सर्व मजा आणि मस्ती करण्याची संधी तुम्हाला यानिमित्तानं मिळाली आहे

दिनांक – १२/१३/१४/१५ एप्रिल २०१८

वेळ – सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत

स्थळ – नरे पार्क मैदान, आयटीसी हॉटेल शेजारी, परळ रेल्वे वर्कशॉप समोर,परळ

प्रवेळ शुल्क – प्रत्येकी २५ रुपयेहेही वाचा-

खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिव्हलची मेजवानीसंबंधित विषय
Advertisement