Advertisement

'या' ठिकाणी घ्या बेस्ट फाइव्ह वॉफल्सचा आस्वाद

वॉफल्स हा मुळचा बेल्जियमचा देशातील पदार्थ. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे आपल्या देशात अलिकडच्या काळातच हा पदार्थ सार्वत्रिक झाला आहे.

'या' ठिकाणी घ्या बेस्ट फाइव्ह वॉफल्सचा आस्वाद
SHARES

वॉफल्स हा मुळचा बेल्जियम देशातील पदार्थ. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे आपल्या देशात अलीकडच्या काळातच हा पदार्थ सार्वत्रिक झाला आहे. आता वॉफल्स म्हणजे काय? असा नेमका प्रश्न तुमच्यापैकी काहींना पडला असेल. आपण कोनमधून आईस्क्रिम खातो त्या कोनसारखाच कुरकुरीत थोडासा जाडसर चौकोनी आकाराचा आणि त्यावर चौकोन कोरलेला, असा गोड पदार्थ म्हणजे वॉफल. गोड सिरपचं टॉपिंग आणि खाली कुरकुरीत वॉफल्स हा चविष्ट आणि देखणा प्रकार आहे. चॉकलेट, मध, आईस्क्रिम आणि रसरसीत फळांनी गार्निश केलेले बेस्ट फाइव्ह वॉफल्स कुठे मिळतात? ते पाहूया.


१) दी बेल्जियम वॉफल को

डोंबिवलीतल्या 'दी बेल्जियम वॉफल को' या कॅफेमध्ये मिळणारा 'रॉकी रोड' हा भन्नाट प्रकार एकदा ट्राय कराच. यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले जातात. त्याशिवाय व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रिमनं भरलेला हा 'वॉफल विच' म्हणजेच वॉफल सँडविच देखील तरूणाईंच्या पसंतीस उतरत आहे.


२) टी व्हिला कॅफे

'टी व्हीला कॅफे'मध्ये चॉकलेट वॉफल्स, बनाना वॉफल, फ्रुट वॉफल, न्यूटेला वॉफल, चॉकलेट किटकॅट आणि ऑरीओ वॉफलचे टॉपिंग असलेलं वॉफल असे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या वॉफल्सचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. इथं वॉफल सर्व्ह करण्याची पद्धत देखील हटके आहे. कॅडबरी चॉकलेटच्या एका पाटीवर सजवलेले वॉफल्स आणि एका छोट्याशा बाऊलमध्ये मागवलेल्या गोड सिरपचा छोटाचा बाऊल आपल्या पुढ्यात सर्व्ह केला जातो.


३) वर्ल्ड ऑफ वॉफल

सिझलर्स किंवा सिझलिंग ब्राऊनी सर्वांनाच आवडते. याच प्रकारातील 'सिझलिंग ब्राऊनी' वॉफलही सध्या हीट आहे. शिवाजी पार्क इथल्या 'वर्ल्ड ऑफ वॉफल' या कॅफेमध्ये त्याची चव चाखण्याची मजा काही औरच. शिवाजी पार्क इथल्या वर्ल्ड ऑफ वॉफल या कॅफेमध्ये त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.


४) वॉफल्स बरांका

'वॉफल्स बरांका' या कॅफेमध्ये 'कँडी वॉफल्स'चे विविध प्रकार मिळतात. कॅरेमल, स्प्रिंकल, ऑरगॅनिक हनी कँडी अशा प्रकारांमध्ये कँडी वॉफल्स मिळतात. परळच्या सोनस टॉवरमध्ये वॉफल्स बरांका हा कॅफे आहे.


५) दी वॉफल ट्री

चौकोनी आकाराच्या वॉफलशिवाय बुडबुड्यांच्या आकाराचे म्हणजे 'बबल वॉफल्स'ही उपलब्ध आहेत. हे बबल वॉफल चॉकलेट, चारकोल आणि रेड व्हेलव्हेट अशा तीन प्रकारात मिळतात. यामध्ये आईस्क्रिम, चोको चिप्स, चोको स्टीक्स, क्रिम चीज आणि रेड व्हेलव्हेट क्रम्ब्स हे स्टफ केलेलं असतं. रोल आणि आईस्क्रिमच्या कोनासारखे हे वॉफल सर्व्ह केले जातात. पवई हिरानंदानी गार्डन इथल्या 'दी वॉफल ट्री' इथं तुम्ही बबल वॉफलची चव चाखू शकता.



हेही वाचा

तुमच्या आवडीचे वॉफल्स फक्त १०० रुपयात!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा