Advertisement

एफसी पुणे सिटीला विफा यूथ लीगचे विजेतेपद


एफसी पुणे सिटीला विफा यूथ लीगचे विजेतेपद
SHARES

एफसी पुणे सिटी या पुण्याच्या संघाने दुसऱ्या सत्रात गोल करून पुण्याच्याच केशव माधव प्रतिष्ठान म्हणजेच केएमपी इलेव्हनचा १-० असा पाडाव करून दुसऱ्या विफा यूथ लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कूपरेज मैदानावर खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीत स्ट्रायकर दिनेश सिंगने केलेला महत्त्वपूर्ण गोल पुणे सिटीला पदार्पणातच विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा ठरला. अतिशय वेगवानपणे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी अाक्रमक फुटबाॅलचे प्रदर्शन केले. पण दोन्ही संघांना पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश अाले.


४९व्या मिनिटाला फुटली कोंडी

अाक्रमक खेळ करूनही एकही गोल गुणफलकावर नोंदवता अाला नसला तरी दिनेश सिंगने ४९व्या मिनिटाला गोलशून्यची कोंडी फोडली. डाव्या पायाने त्याने मारलेला फटका गोलजाळ्यात गेला अाणि एफसी पुणे सिटीच्या खेळाडूंनी जल्लोष केला. पुणे सिटीने ही अाघाडी अखेरपर्यंत टिकवत विजेतेपदाचा मान पटकावला.


हे ठरले सर्वोत्तम

पुणे सिटीचा कर्णधार फ्रँकलिन नाझरेथ याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. केंकरे एफसीचा स्ट्रायकर डेक्स्टर फर्नांडेस याने गोल्डन बूट पुरस्कार पटकावला. त्याने या सामन्यात तब्बल ११ गोल नोंदवले.


हेही वाचा -

पाेर्तुगालचा पावलो मच्याडो मुंबई सिटी एफसीमध्ये सामील

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा