अारनाॅल्ड इस्सोको मुंबई सिटी एफसीशी करारबद्ध


अारनाॅल्ड इस्सोको मुंबई सिटी एफसीशी करारबद्ध
SHARES

मुंबई सिटी एफसीने अागामी इंडियन सुपर लीगच्या (अायएसएल) मोसमासाठी अापल्या संघात सहाव्या अांतरराष्ट्रीय खेळाडूला सामील करून घेतले. काँगोचा २६ वर्षीय फुटबाॅलपटू अारनाॅल्ड एनकुफो इस्सोको अाता मुंबई सिटी एफसी संघाशी करारबद्ध झाला अाहे. मंगळवारी क्लबने ही घोषणा केली असून यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करण्याचा विश्वासही व्यक्त केला.


अारनाॅल्डची कारकीर्द

पोर्तुगालमधील रेबोर्डोसा एसी संघाकडून सिनियर गटात पदार्पण करताना अारनाॅल्डने मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक जाॅर्ज काॅस्टा यांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रीमिएरा लीगमधेय जीडी चावेस संघाकडून खेळताना त्याने अापल्यातील कौशल्य सिद्ध केले होते. त्याने जीडी घावेसकडून ६५ सामने खेळताना ८ गोल झळकावले होते. त्याचबरोबर विटोरिया डे सेबुटल संघाकडून ३६ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना त्याने ५ गोल लगावले अाहेत.


चिअांगमाय एफसीशी बरोबरी

अारनाॅल्डला खेळताना पाहिले तेव्हा त्याची खेळाविषयीची बांधीलकी अाणि त्याचे कौशल्य पाहून प्रभावित झालो होते. मुंबई सिटी एफसीसाठी तो परफेक्ट खेळाडू अाहे, असे जाॅर्ज कोस्टा यांनी सांगितले. दरम्यान, थायलंड येथे सरावादरम्यान खेळविण्यात अालेल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने चिअांगमाय एफसी संघाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. अाता अारनाॅल्डही लवकरच थायलंडमध्ये सराव शिबिरात दाखल होणार अाहे.


हेही वाचा -

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?संबंधित विषय