Advertisement

फुटबॉल स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा विजय


फुटबॉल स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा विजय
SHARES

भारतीय क्रिकेट संघ आणि बॉलीवूड सेलिब्रिटीजमध्ये झालेल्या फुटबॉल क्लासिको मैत्रीपूर्ण सामन्यात ऑल हार्ट फुटबॉल क्लब संघाने ऑल स्टार्स फुटबॉल क्लबला 7-3 आशा फरकाने मात देत विजय मिळवला. क्रिकेटच्या मैदानात विकेट किपरची भूमिका बजावणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने सुरुवातीला दोन गोल करत संघ विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सामना रविवारी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळवण्यात आला.


सामन्यातील पहिल्या सत्रात भारतीय क्रिकेट संघाने सामन्याच्या सुरुवातीला 7 व्या मिनिटाला गोल करत 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर काही वेळानंतर धोनीने पुन्हा 39 व्या मिनिटाला गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यांनतर 41 व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरवर अनिरुद्ध श्रीकांतने हेडरवरून गोल करत ऑल हार्टला 3-0 वर घेऊन गेला. भारतीय क्रिकेट संघाच्या या कामगिरीने बॉलीवूड सेलिब्रिटीज संघ थोडा दबावाखाली गेला.

दुसऱ्या सत्र देखील भारतीय संघाच्या नावावर राहिला. 51 मिनिटाला पेनल्टीवरून अनिरुद्ध श्रीकांतने पुन्हा गोल करत 4-1 वर आघाडी घेतली. यानंतर 57 व्या मिनिटाला ऑल स्टार कर्णधार रणबीर कपूरने गोल करत आघाडीमधील फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर बराच वेळ दोन्ही संघाकडून एकही गोल झाला नाही. शेवटच्या काही मिनिटात पुन्हा एकदा खेळात आक्रमकपणा दिसला. केदार जाधवने ऑल हर्ट्स कडून गोल करत 5-2 असा स्कोर केला. सामन्याच्या 92 व्या मिनिटाला कर्णधार विराट कोहलीने पहिला गोल केला. त्यानंतर शिखर धवनने गोल करत संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा - 

क्रिकेट नव्हे, विराट खेळणार फुटबॉल!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा