Advertisement

विफा यूथ लीगमध्ये केएमपी इलेव्हन, पुणे एफसी सिटी फायनलमध्ये भिडणार


विफा यूथ लीगमध्ये केएमपी इलेव्हन, पुणे एफसी सिटी फायनलमध्ये भिडणार
SHARES

केएमपी इलेव्हन अाणि एफसी पुणे सिटी या पुण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत विजय मिळवून चर्चगेट येथील कूपरेज मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या विफा यूथ लीगमध्ये (१४ वर्षांखालील) अंतिम फेरी गाठली अाहे. केएमपी इलेव्हनने पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरच्या खंडोबा टीएम संघाला २-० असे हरवले. दुसऱ्या उपांत्य लढतीत एफसी पुणे सिटीने कोल्हापूरच्या पाटाकडील टीएम संघावर ३-१ असा विजय मिळवला.


दुसऱ्या सत्रात केएमपीची बाजी

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी अाक्रमक खेळ केला तरी त्यांना गोल करण्यात अपयश अाले. अखेर सॅम्यूएल सेल्वाराज याने ५२व्या मिनिटाला केएमपी इलेव्हनचे खाते खोलले. त्यानंतर लगेचच मुस्तफा शेखने गोल करून केएमपीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन मिनिटांत दोन गोल झाल्यामुळे खंडोबी टीए संघाला कमबॅक करणे शक्य झाले नाही.


वियान मुरगोडची चमक

एफसी पुणे सिटीच्या विजयात वियान मुरगोडने चमक दाखवली. ३३व्या मिनिटाला त्याने पहिला गोल झळकावल्यानंतर कुपिंदर पोवार याने ३८व्या मिनिटाला गोल करत पाटाकडील संघाला बरोबरी साधून दिली. मात्र वियानने ४७व्या मिनिटाला दुसरा गोल लगावला. त्यानंतर ६०व्या मिनिटाला कुंवरपाल सिंगने केलेल्या गोलमुळे एफसी पुणे सिटी संघाने ३-१ असा विजय नोंदवला.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा