फुटबॉलच्या 'आयएसएल'मध्ये 'बलवंत सिंग' महागडा खेळाडू


फुटबॉलच्या 'आयएसएल'मध्ये 'बलवंत सिंग' महागडा खेळाडू
SHARES

भारतातील प्रमुख राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा म्हणजेच इंडियन सुपर लीग (आयएसएल)मध्ये मुंबईच्या सीटी एफसी संघातल्या बलवंत सिंगवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला एकूण 65 लाख इतकं मानधन मिळणार आहे. यंदाच्या चौथ्या हंगामात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागली. मुंबई संघात बलवंत सिंग हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यानंतर अरींदम भट्टाचार्यवर 64 लाखांची बोली लागली. आयएसएलमध्ये असलेल्या विविध संघातील एकूण 134 खेळाडूंवर बोली लागली.


मुंबईच्या या 13 खेळांडूंवर लागली बोली

 • बलवंत सिंग - 65 लाख
 • अरींदम भट्टाचार्य - 64 लाख
 • राजू गायकवाड - 47 लाख
 • अभिनाश रुईदास - 18 लाख
 • साहील तावोरा - 6 लाख
 • एबोरलाँग खोंगजी - 35 लाख
 • संजू प्रधान - 30 लाख
 • झाकीर मुंडांपरा - 18 लाख
 • बीस्वजीत साहा - 6 लाख
 • प्रांजल भूमीज - 6 लाख
 • मेहराजुद्दीन वाडू - 43 लाख
 • कुणाल सावंत - 15 लाख
 • एल. किमकिमा - 20 लाख

मुंबईच्या सीटी एफसी संघाने ट्विटरवर याबद्दली संपूर्ण माहिती शेअर केली आहे. 
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय