Advertisement

फिफा ट्रॉफी मुंबईत पोहोचली


फिफा ट्रॉफी मुंबईत पोहोचली
SHARES

फिफा अंडर-१७ फुटबाॅल वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं या वर्ल्डकपची ट्राॅफी नेमकी कशी असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईकरांची हीच उत्सुकता शमवण्यासाठी रविवारी संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे ही ट्राॅफी ठेवण्यात आली होती. 

ट्रॉफी बघण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. भारतात जिथे जिथे फुटबॉलचे सामने होतील, तिथे तिथे ही ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे.भारतात पहिल्यांदाच होणारी फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धा कधी सुरू होतेय, याकडं सर्वांचेच लक्ष लागलं आहे. ही स्पर्धा येत्या ६ ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 

नवी मुंबईसह दिल्ली, गुवाहाटी, कोची, गोवा, आणि कोलकत्ता अशा सहा शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने रंगतील. ट्राॅफीच्या अनावरणाप्रसंगी सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, मुंबई जिल्हा फुटबॉल अससोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.


हेही वाचा - 

फिफा अंडर-17 ट्रॉफीचे अनावरण

फिफा अंडर-17च्या या प्रोमो साँगची फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा