Advertisement

मुंबईतली मुलं खेळणार स्पेनमध्ये फुटबॉल!


मुंबईतली मुलं खेळणार स्पेनमध्ये फुटबॉल!
SHARES

मुंबईतील मुलांना स्पेनमधील फुटबॉल मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. 'तृणा इंडिया' या संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील फुटबॉलप्रेमी मुला-मुलींना स्पेन-कॅटलोनिआ येथील फुटबॉल मैदानात फुटबॉल खेळण्याची संधी मिळणार आहे.


कशी मिळणार संधी?

या साठी १०, १२, १४ आणि १६ हे वयोगट निश्चित करण्यात आले असून, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यातील मुले-मुली या प्रकल्पामार्फत स्पेनला जाऊ शकणार आहेत. या मुलांना जगप्रसिद्ध 'स्मार्ट फुटबॉल' ही संकल्पना यशस्वी करुन अनेक प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंना घडवणारे फुटबॉल प्रशिक्षक अल्बर्ट विनस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


काय आहे तृणा इंडिया?

पुण्यातील तृणा इंडियाचे जिग्नेश कारिया यांची ही संकल्पना आहे. बांधकाम व्यवसायात असूनही लहानपणापासूनचे फुटबॉल खेळावरचे प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत. स्पेनमधील त्यांचे स्नेही क्रिशन लल्ला यांच्या पोडिग्री एक्सपिरियन्स संस्थेशी संलग्न होऊन 'स्मार्ट फुटबॉल'बरोबर पाच वर्षांचा करार केला आणि या प्रकल्पाची घोषणा भारतात करण्याचा निर्णय घेतला.

मुलांमध्ये फुटबॉलचे प्रेम वाढावे आणि आपल्या देशातून देखील फुटबॉल पटू घडावेत यासाठी ही संकल्पना मी चालवत आहे. यामध्ये गरीब मुलांना देखील आम्ही घेणार आहोत. यातून पुढे त्यांना फुटबॉल क्षेत्रात संधी मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.

जिग्नेश कारिया, अध्यक्ष, तृणा इंडिया


कसं असेल प्रशिक्षण?

या प्रकल्पामध्ये अल्बर्ट विनस यांनी स्वतः विकसित केलेली ‘फुटबॉल, अ कॅटलन वे’ ही पद्धती वापरून मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये स्पेनमधील फुटबॉलच्या विविध प्रकारच्या (ग्रास, आर्टिफिशिअल, हायब्रीड) मैदानांवर खेळण्याची संधी, तसेच स्मार्ट फुटबॉल म्हणजे नेमकं काय? खेळाडूंची मानसिक व शारीरिक तयारी, व्यक्तिमत्व विकास, तसेच हौशी आणि व्यवसायिक क्रीडापटू होण्यासाठीची सर्व तयारी करून घेतली जाते. या कार्यशाळा मुलांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतात. तसेच, या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या 100 मुलांमागील दोन गरीब मुलांच्या प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि इतर सर्व खर्च या संस्थेद्वारे करण्यात येणार आहे.



हेही वाचा

अशी आहे मुंबई सिटी एफसीची नवीन जर्सी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा