निखिलच्या दुहेरी गोलमुळे शेलार एफसी विजयी


निखिलच्या दुहेरी गोलमुळे शेलार एफसी विजयी
SHARES

दुसऱ्या बोरिवली प्रमियर फुटबॉल लीगमध्ये चॅलेंजर एफसीसोबत झालेल्या सहाव्या सामन्यात शेलार एफसीने विजय मिळवला. बोरिवली स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेली ही स्पर्धा मंगळवारी बोरिवलीच्या सेंट डीअसीस मैदानावर रंगली.

शेलार एफसीच्या निखिल घार्ग दुहेरी गोल करुन विजयी कामगिरी केली. सामन्याच्या सुरुवातीला विशाल नायर याने 29 व्या मिनिटाला गोल केला. शेलार एफसीच्या संघाने उत्कृष्ट असा खेळ करत आपले वर्चस्व राखले. या सामन्यातील 'बिग बॉस प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार शेलार एफसीच्या निखिल घार्ग याला मिळाला.

याआधी मेरीलॅंड युनायटेड आणि टायगर एसएफमध्ये झालेल्या सामन्यात 1-0 अशा फरकाने टायगर एसएफला पराभव पत्करावा लागला. सामना सुरू झाल्यापासून ते शेवटच्या काही क्षणांपर्यंत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकही गोल केला नव्हता. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडत होते. या रोमांचक अशा लढतीत मेरीलॅंडच्या कोलीन अब्रान्चेस याने अखेर 55व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आघाडी घेत 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात सुकेश शास्त्री हा बिग बॉस प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय