ला लीगा मुंबईत उभारणार फुटबाॅल स्कूल


ला लीगा मुंबईत उभारणार फुटबाॅल स्कूल
SHARES

रिअल माद्रिद, बार्सिलोना यांसारख्या मातब्बर संघांचा समावेश असलेल्या लोकप्रिय स्पॅनिश फुटबाॅल लीग म्हणजेच ला लीगातर्फे बुधवारी इंडिया अाॅन ट्रॅकशी भागीदारीची घोषणा करण्यात अाली. त्यानुसार भारतात अाता पुढील पिढीचे फुटबाॅलपटू घडविण्यासाठी अाणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ला लीगा फुटबाॅल स्कूलची स्थापना करण्यात अाली. भारतात तळागाळातील मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणारी ला लीगा ही पहिली अांतरराष्ट्रीय फुटबाॅल लीग ठरणार अाहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू अाणि कोची या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये ला लीगा फुटबाॅल स्कूल उभारण्यात येणार अाहेत.


युवा खेळाडूंवर लक्ष

ला लीगा फुटबाॅल स्कूलमध्ये ६ ते १८ वयोगटातील युवा खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार अाहे. ला लीगाच्या तांत्रिक अभ्यासक्रमानुसार तसेच सविस्तर पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाणार असून त्यासाठी ला लीगाने भारतासाठी कार्यक्रम तांत्रिक संचालकाची नियुक्ती करण्यात अाली अाहे. युवा खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्तीही केली जाणार अाहे.


३८० सामने फेसबुकवर

ला लीगाने नुकताच फेसबुक इंक या सोशल मीडिया कंपनीशी तीन वर्षांकरिता करार केला असून भारतीय उपखंडात ला लीगाचे सर्व ३८० सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून २७० दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांना त्याचा मोफत लाभ उठवता येणार अाहे. निवडक सामने सोनी पिक्चर्स नेटवर्कवरही दाखविण्यात येणार अाहेत. रिअल माद्रिद अाणि बार्सिलोना यांसारख्या क्लबचे भारतात भरपूर चाहते अाहेत.

युवा अाणि गुणवान फुटबाॅलपटूंचा विकास करण्यासाठी ला लीगा नेहमीच प्रयत्नशील असतो. फुटबाॅल या सर्वात सुंदर खेळाविषयीची अावड अाणि गुणवत्ता लक्षात घेता अाणि गुणवान खेळाडूंना तयार करण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी अाम्ही अायअोटीशी करार करण्याचे ठरवले. अामच्या सर्वोत्तम प्रशिक्षक अाणि पायाभूत सोयीसुविधांचा फायदा उठवून ला लीगाच्या प्रशिक्षण पद्धतीनुसार, भारतातील युवा मुले-मुली किती प्रगती करतात, याची उत्सुकता अाम्हाला लागून राहिली अाहे.
- जोस ककाझा, ला लीगाचे भारतातील प्रमुख.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश



संबंधित विषय