Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

मुंबईत वाढवणार १ हजार ऑक्सिजन बेड: आयसीयू, व्हेंटिलेटरही वाढवणार

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन मुंबईत १ हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका येत्या आठवड्याभरातच ही यंत्रणा उभी करणार आहे.

मुंबईत वाढवणार १ हजार ऑक्सिजन बेड: आयसीयू, व्हेंटिलेटरही वाढवणार
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या मुंबईत वेगाना रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन मुंबईत १ हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १०० आयसीयू आणि १०० व्हेंटिलेटरही  वाढवले जाणार आहेत.

मुंबई महापालिका येत्या आठवड्याभरातच ही यंत्रणा उभी करणार आहे. भायखळा येथील रिचर्डस क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये एक हजार ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार असल्याचं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

भायखळ्याच्या रिचर्डसन क्रुडास या ठिकाणी १ हजार बेड मागील काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने कमी करण्यात आले होते. तर  ५०० बेड परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या क्वारेंटाइनसाठी ठेवण्यात आले होते. मात्र ,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे सर्व बेड कोरोना रुग्णांसाठी सुरू करावेत अशी मागणी स्थायी समितीमध्येही करण्यात आली होती. या ठिकाणचे ऑक्सिजन बेड तातडीने सुरू करावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. 

पालिकेकडे सध्या एकूण ११,१२४ ऑक्सिजन बेड आहेत. यातील १०, ०२८ बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १०९६ बेड रिक्त आहेत. जम्बो सेंटर आणि विविध रुग्णालयात २८४९ आयसीयू बेड आहेत. यामधील २७९८ बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून ५१ बेड रिक्त आहेत.  १४५१ व्हेंटिलेटर बेडपैकी १४३२ बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १९ बेड रिक्त आहेत.हेही वाचा -

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार - किशोरी पेडणेकर

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा