Advertisement

कोरोना लसीचे १० कोटी डोस डिसेंबरपर्यंत भारतात होणार उपलब्ध

डिसेंबर २०२० पर्यंत भारतात कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीचे १० कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली.

कोरोना लसीचे १० कोटी डोस डिसेंबरपर्यंत भारतात होणार उपलब्ध
SHARES

डिसेंबर २०२० पर्यंत भारतात कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीचे १० कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लस निर्मितीबाबत जगातील पाच विविध संस्थांसोबत करार केले आहेत.

अदर पुनावाला म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात अॅस्ट्राझेनका कंपनीच्या 4 कोटी लस तयार करण्यात आल्या आहेत.  अंतिम चाचणीत या लसीचा कोरोना रुग्णांवर अपेक्षित परिणाम झाला तर केंद्र सरकारकडून डिसेंबरच्या अखेरपर्यंत लसीला मान्यता मिळवता येईल. सुरुवातीला निर्मिती करण्यात येणाऱ्या लसीचं वाटप भारतात होईल आणि त्यानंतरच्या काळात दक्षिण आशियातील देशांत 50-50 या प्रमाणात लसीचे वाटप करण्यात येईल.

गरीब राष्ट्रांना कोरोनाची ही लस उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे आणि या लसीसंदर्भात गोदरच करार केला आहे. 2024 पर्यंत ही लस सर्व जगात उपलब्ध होईल. परंतु या लसीची किंमत आणि याच्या निर्मितीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी त्यानंतर दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

सुरुवातीच्या काळात या लसीची उपलब्धता ही गंभीर, गरजू रुग्ण आणि कोरोना योद्ध्यांना करण्यात यशस्वी होऊ असा अदर पुनावालांना विश्वास आहे. गुरुवारी सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ने या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण केल्याची घोषणा केली होती.



हेही वाचा -

अखेर भाविकांसाठी प्रार्थनास्थळ सुरू

मुंबईत कोरोना रुग्णाच्या दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा