Advertisement

राज्यात शुक्रवारी १० हजार १३८ कोरोना रुग्ण बरे

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ७१५ इतकी झाली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ५६२ आहे.

राज्यात शुक्रवारी १० हजार १३८ कोरोना रुग्ण बरे
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) शुक्रवारी कोरोनाच्या (coronavirus) नवीन ९ हजार ६७७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसंच दिवसभरात १५६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

राज्यात आतापर्यंत १ लाख २० हजार ३७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर २ टक्के आहे. तर आतापर्यंत ५७ लाख ७२ हजार ७९९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९४ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ७१५ इतकी झाली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ५६२ आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १४ हजार १८२  आहे. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ५३७ इतकी आहे. साताऱ्यात ७ हजार २९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ९०८ इतकी झाली आहे. 

नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १९७, अहमदनगरमध्ये ३ हजार ४६७, औरंगाबादमध्ये १ हजार ३५०, नांदेडमध्ये ९६९ इतकी आहे. जळगावमध्ये १ हजार ०६८, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ७०६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ६०५ इतकी आहे.



हेही वाचा -

महापालिकेचं पहिलं २१ मजली स्वयंचलित वाहनतळ सुरू

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा