Advertisement

हिंदुजा रुग्णालयात १०१ वर्षांच्या आजोबांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी इथं एका १०१ वर्षांच्या आजोबांना कोरोना लस देण्यात आली.

हिंदुजा रुग्णालयात १०१ वर्षांच्या आजोबांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस
SHARES

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना आखत आहे. पण तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं लस मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला आरोग्य सेवा देणाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याण्यास सुरुवात झाली आहे.

नुकतीच पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी इथं एका १०१ वर्षांच्या आजोबांना कोरोना लस देण्यात आली. श्री. रुई दे नावरो मेनेझेस यांनी लसीचा पहिला डोस घेतला. श्री. मेनेझेस यांच्यासमवेत त्याचा मुलगा श्री. फर्नांडो दे नावरो मेनेझेस हे देखील एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना देखील कोरोना लस देण्यात आली.

हिंदुजा तर्फे सांगण्यात आलं की, रुग्णालयानं घेतलेल्या काळजी बद्दल दोघेही आनंदी आहेत. लस घेण्यासंबंधी कोणत्याही भीतीबद्दल बोलताना श्री. फर्नांडो मेनेझेस म्हणाले, "खरं तर लस सर्व सामान्यांसाठी उपलब्ध झाल्यावर माझे वडिल डोस घेण्यासाठी उत्सुक होते. आज ते खूप उत्साही होते आणि आता कोविडचा दुसरा डोस घेण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ.”

दरम्यान, लसीचा पहिला डोस घेतल्यानं एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हे गृहस्थ राहयला गोरेगाव इथले होते. मुंबई मिररनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. पण या गहस्थांना अनेक आजार असल्याचं देखील समोर आलं आहे.  

जोगेश्वरी इथल्या मिल्लट नर्सिंग होममध्ये त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेण्याच्या काही मिनिटांतच ते कोसळले आणि दीड तासानंतर आयसीयूमध्ये त्यांचं निधन झालं.

लसीकरणानंतरच मृत्यूची नोंद झालेली ही पहिलीच घटना आहे. परंतु तज्ञ समितीनं केलेल्या आढावा घेईपर्यंत प्रशासकिय अधिकाऱ्यांनी त्याचा थेट लसीकरणेशी संबंध जोडला जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' भागात कोविड रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढतायेत रुग्ण, अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा