Advertisement

मुंबईतल्या 'या' भागात कोविड रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

प्रभागात आढळून आलेल्या बहुतेक कोविडच्या रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं नाहीत किंवा सौम्य लक्षणं आहेत.

मुंबईतल्या 'या' भागात कोविड रुग्णवाढीचा दर सर्वाधिक
SHARES

वृत्तानुसार, वांद्रे पश्चिम, खार पूर्व आणि सांताक्रूझ वेस्ट असलेल्या ‘एच’ वेस्ट प्रभागात कोरोनाव्हायरसचा वाढीचा दर सर्वाधिक आहे. तरीही सक्रिय रुग्णांची संख्या फारशी जास्त नाही.

सध्या प्रभागात ३८४ सक्रिय ताजी प्रकरणं आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रभागात आढळून आलेल्या बहुतेक कोविडच्या रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं नाहीत किंवा सौम्य लक्षणं आहेत.

फ्री प्रेस जर्नलच्या अहवालात सहाय्यक महानगरपालिका आयुक्त आणि आरसी (बोरिवली) प्रभाग प्रभारी भाग्यश्री कापसे यांनी नमूद केलं आहे की, कोरोनाचे नुकतेच पॉझिटिव्ह आलेले ५४ टक्के रुग्ण हे ऑफिसला जाणारे होते. त्यांनी प्रवास केला होता. तर २५ टक्के हे त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत.

दरम्यान, सोमवारी, ८ हजार ७४४ ताज्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २२ लाख २८ हजार ४७१ च्या घरात गेला आहे. सध्या राज्यात ९७ हजार ६३७ रुग्ण सक्रिय आहेत. दिवसभरात ९ हजार ०६८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या २० लाख ७७ हजार ११२ इतकी आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील २२ हून अधिक जणांना या आजारानं आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकूण आता ५२ हजार ५०० वर पोहोचला आहे. तर ४ लाख ४१ हजार ७०२ घरातच क्वारंटाईनमध्ये आहेत. ४ हजार ०९८ रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल आहेत.

दुसरीकडे, सोमवारी मुंबईत १ हजार ००८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ९५६ रुग्ण बरे झाले तर ४ जणांचा मृत्यू झाला.



हेही वाचा

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढतायेत रुग्ण, अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा