Advertisement

ठाण्यात ३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित

६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ठाण्यात ३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित
SHARES

६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरु केली आहेत.  

 महापालिकेच्यावतीने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्टकोविड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया, कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, आझादनगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी. आर. वाडिया आरोग्य केंद्र, गांधीनगर, कळवा, कौसा आरोग्य केंद्र, किसननगर, लक्ष्मी चिरागनगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र, माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकरनगर आरोग्य केंद्र, आनंदनगर आरोग्य केंद्र आदी ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

खासगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल, कौशल्य रुग्णालय आदींचा समावेश आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा