Advertisement

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे...

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
SHARES

कोरोना लसीकरण मोहीमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण धक्कादायक माहिती समोर आली आहे की, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हे गृहस्थ राहयला गोरेगाव इथले होते. मुंबई मिररनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.  

जोगेश्वरी इथल्या मिल्लट नर्सिंग होममध्ये त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेण्याच्या काही मिनिटांतच ते कोसळले आणि दीड तासानंतर आयसीयूमध्ये त्यांचं निधन झालं.

लसीकरणानंतरच मृत्यूची नोंद झालेली ही पहिलीच घटना आहे. परंतु तज्ञ समितीनं केलेल्या आढावा घेईपर्यंत प्रशासकिय अधिकाऱ्यांनी त्याचा थेट लसीकरणेशी संबंध जोडला जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.

६५ वर्षीय गृहस्थांना जोगेश्वरी केंद्रात दुपारी ३.३७ वाजता लस देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटातच ते खुर्चीवरून कोसळले. प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते दुपारी ३.३० वाजता केंद्रावर पोहोचले होते आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस कोविशिल्ड त्यांना ०.५ इतका डोस देण्यात आला.

पालिकेनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, " त्यांना डिल्टेड कार्डिओमायोपॅथी (हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते), उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे अनेक प्रकारचे आजार आहेत."

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितलं की, लसीकरण समिती (एईएफआय)नंतर उद्भवलेल्या प्रतिकूल घटनांचा आढावा घेईल. “हे अ‍ॅनाफिलेक्टिक शॉकचे असेल तर आम्हाला माहित नाही. समिती सर्व तपशील पाहिल्यानंतर कारण सांगेल,” असं त्या म्हणाल्या.

दुसर्‍या प्रशासकिय अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्या व्यक्तीला अ‍ॅड्रेनालाईन इंजेक्शन दिले गेले होते. लसीकरणानंतर त्यांना त्रास झाल्यानं ताबडतोब आयसीयूमध्ये हलवण्यात आलं, तिथेच त्यांचे सायंकाळी ५.०५ वाजता निधन झालं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आरएन कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

राज्य अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शहरात जवळजवळ ४ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी ४०० नागरिक किरकोळ एईएफआय ग्रस्त आहेत. काही रुग्णालयात दाखल झाली आहेत.

लसीकरणानंतर संपूर्ण भारतभरात ४० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु केंद्राच्या म्हणण्यानुसार, या लसीमुळेच कोणालाही नुकसान झाले नाही. गेल्या आठवड्यात भिवंडी इथल्या एका ४०  वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याल दुसरा डोस मिळाल्यानंतर मृत्यू झाला होता.



हेही वाचा

दिलासादायक! कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर

मुंबईमध्ये कोरोना वाढतोय, मात्र मृत्युदरातील घट कायम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा