Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार २८९ झाली आहे. 

बुधवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २१, नेरुळ २०, वाशी १४, तुर्भे १३, कोपरखैरणे ११, घणसोली ६, ऐरोली १४, दिघातील ३ रुग्णांचा समावेश आहे. तर ९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

 बेलापूर २४ नेरुळ ११, वाशी ९, तुर्भे ९, कोपरखैरणे ९, घणसोली ४, ऐरोलीतील २७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६,९५४ झाली आहे. तर मृतांचा आकडा १००५ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. सप्टेंबरमध्ये ५००हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता अवघ्या१३ वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे.

आतापर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील १३४ अधिकारी, ९३१ कर्मचारी व कुटुंबीयांपैकी ६१९ असे १६८४ कोरोनाबाधित झाले होते. यामधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयास पालिका आयुक्तांनी मंगळवारी अचानक भेट दिली. यावेळी पालिका सेवेत ऑनकॉलवर असलेले आठ आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याचं आढळलं. या डाॅक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोरोनासाठी असलेले हे रुग्णालय नुकतंच सार्वजनिक करण्यात आलं आहे. येथील आरोग्य सेवेची पाहणी आयुक्तांनी अचानक भेट देत केली. यात हजेरीपत्रक तपासताना ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत खुलासा घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे. हजेरी पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीची स्वाक्षरी नसल्याचे आढळून आले.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा