Advertisement

एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोनावर मात, बरे होऊन घरी परतले

मुंबईतून उपनगरीय रुग्णालयातूनही 102 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोनावर मात, बरे होऊन घरी परतले
SHARES

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातून मंगळवारी 100 वा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबईतून उपनगरीय रुग्णालयातूनही 102 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील 6 रुग्णांचा समावेश आहे. तर इतर बरे झालेल्यांमध्ये 8 बालके आणि 14 ज्येष्ठ नागरिक आहेत.

राज्यातील एकूण रूग्णांपैकी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयातून 100 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची बातमी आली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईतील उपनगरीय रुग्णालयातील 102 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 45 स्त्रिया व 57 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये 8 बालकांचा आणि 60 वर्षे वयावरील 14 ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या रुग्णांमधील 6 जण एकाच कुटुंबातील आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि उपनगरीय रुग्णालयातील प्रभावी वैद्यकीय सेवेनंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 39 रुग्ण हे जोगेश्वरी परिसरात असणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत.‌ या खालोखाल घाटकोपरमधील राजावाडी परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून 27 रुग्ण, तर कुर्ला परिसरातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून 24, वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालयातून 9 रुग्ण, कांदिवली पश्चिम परिसरातील 'भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून' 3 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.



हेही वाचा -

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा