Advertisement

दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतून एक दिलासादायक बातमी आहे.

दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही
SHARES

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतून एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जी दक्षिण वॉर्डमधील ९ ठिकाणी मागील दहा दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं ही ठिकाणं कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आली आहेत.

 जी दक्षिण विभागातील वरळी आणि प्रभादेवीतील रुग्णांची संख्या मोठी आहे. हे दोन्ही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे येथील अनेक भाग कंटनेमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. परिणामी येथील रहिवाशांवर लॉकडाऊनपेक्षाही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, मागील दहा दिवसांत येथे कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे येथील ९ ठिकाणांवरचे अतिरिक्त निर्बंध उठवण्यात आले आहेत. 

 आदर्श नगर, सिद्धी प्रभा बिल्डिंग, वरळी पोलीस कॅम्प, साती आसरा, उत्कर्ष बिल्डिंग, बीडीडी चाळ, लोढा वर्ल्ड वन, आनंदछाया बिल्डिंग आणि आहुजा बिल्डिंगला कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आलं आहे. या नऊ झोनमध्ये सुमारे ४ हजार लोकांची वस्ती असून तिथं ४८ लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते. मुंबईतील मोठ्या कंटेनमेंट झोनपैकी असलेले वरळी कोळीवा़डा , जिजामाता नगर आणि जनता कॉलनीत यापुढंही निर्बंध कायम राहणार आहेत. जी दक्षिण विभागात सध्या ३,५५४ लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं आहे.हेही वाचा -

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा