Advertisement

कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण, २ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन १०९ रुग्ण आढळले. तर २ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण, २ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन १०९ रुग्ण आढळले. तर २ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात २८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४९,२९१ झाली आहे. यामध्ये २०२६ रुग्ण उपचार घेत असून ४६,२६९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आतापर्यत ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन ९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १८, कल्याण प ३२, डोंबिवली पूर्व ३९, डोंबिवली प १७, मांडा टिटवाळा २, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून, डोंबिवली जिमखाना येथून ३ रुग्ण, पाटीदार भवन येथून १४ रुग्ण, तर शास्त्री नगर रुग्णालयातून १ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवरसंबंधित विषय